आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:देऊळघाटात 18 लाखांचा गुटखा जप्त

बुलडाणा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. यावेळी पोलिसांनी चार चाकी वाहन, एक मोबाइल व गुटखा असा १८ लाख ३९ हजार ४४० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या देऊळघाट येथे करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज ८ सप्टेंबर रोजी पहाटे गस्तीवर असताना त्यांना वाघजाळ फाटा मार्गे देउळघाट येथे एमएच २८ / बी/ ८८१६ या क्रमांकाच्या वाहनातुन गुटखा येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ८ लाख २९ हजार ४४० रुपये किमतीचा वाह कंपनीचा सुगंधीत पान मसाला गुटखा मिळून आला. त्यानंतर गुटख्यासह चारचाकी वाहन, एक मोबाइल असा एकूण १८ लाख ३९ हजार ४४० रुपयांचा माल जप्त केला. वाहन चालक शेख सलीम शेख इस्माईल वय ५४ रा. आनंद नगर चिखली यास विचारणा केली असता त्याने हा गुटखा देऊळघाट येथील शेख शकील शेख सत्तार याचा असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, पोलिस निरीक्षक बळीराम गिते, ग्रामीणचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनीष गावंडे, सोनकांबळे, पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेका रामविजय राजपूत, दीपक लेकुरवाळे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...