आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:दहिवदला पोलिसांनी पकडला 16 लाखांचा गुटखा; संशयितास अटक

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा किराणा मालाच्या आड विक्री करण्याच्या उद्देशाने जात असलेला ट्रक सांगवी येथील शिरपूर तालुका पोलिसांनी दहिवद येथे पकडला. या कारवाईत १६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२ जून रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. सांगवी पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी दहिवद शिवारातील आरती हॉटेलसमोर वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री दीडला पोलिसांनी संशयावरून ट्रक (आरजे ०७, जीबी १२५९) थांबवला. विचारपूस केली असता चालकाने ट्रकमध्ये किराणामाल असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांना संशय वाढल्याने वाहनाची ताडपत्री उघडून पाहिले असता वाहनात किराणा मालाच्या आड प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. ट्रक जप्त करुन पोलिस ठाण्यात नेण्यात आला. या कारवाईत १६ लाख ४९ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा आणि २० लाखाचा ट्रक असा एकुण ३६ लाख ४९ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चालक इम्रान मो हरुन (३०) रा. महूवार ता. कांदीपुर जि. प्रतापगड उत्तर प्रदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक सुरेश सिरसाठ, उपनिरीक्षक भिकाजी पाटील, असई लक्ष्मण गवळी, पोकॉ योगेश मोरे, संतोष पाटील, कृष्णा पावरा, रोहिदास पावरा, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...