आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हुंड्यासाठी विवाहितेचा छळ ; विवाहित महिलेला शिवीगाळ करून मारहाण

मोताळा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेत विवाहित महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच माहेराहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याची घटना मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे घडली. प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे लग्न मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील नितेश राठोड यांच्यासोबत झाले होते. मागील ६ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास पती नितेश राठोडने चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच पती नितेश राठोड, सासरा दयाराम राठोड, सासू बेबीबाई राठोड आणि नणंद संगीता पवार यांनी तुझ्या आई-वडिलांकडून शेतीच्या कामासाठी ४० हजार रुपये आण, अन्यथा तुला वागवणार नाही, अशी धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील नितेश राठोड, दयाराम राठोड, बेबीबाई राठोड आणि संगीता पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकाॅ शिवाजी मोरे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...