आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, तीन जण जखमी

संग्रामपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात साठ वर्षीय वृध्द जागीच ठार झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास टुणकी शिवारात घडली.

तालुक्यातील टुनकी लाडनापूर रस्त्यावर बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या एम.पी. ६८ / एम.डी / ६०८० या क्रमांकाच्या दुचाकीची व बऱ्हाणपूरकडून येणाऱ्या विना क्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एम.पी. ६८ /एमडी /६०८० या क्रमांकाच्या दुचाकीवरील रुमालसिंग केवळ्या जमरा (६०) रा धापळपुरा ता. बऱ्हाणपूर या वृद्धाचा जागीच मुत्यू झाला. तर गुलाबसिंग सरदार राठोड (५०) रा. चिलारा ता बऱ्हाणपूर हे गंभीर जखमी झाले आहेत. तर विना क्रमांकाच्या दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची माहिती मिळताच बीट जमादार मोहन पवार यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमीना सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलवले. डॉक्टरांनी तपासणी करून रुमालसिंग केवळ्या जमरा यांना मृत घोषीत केले. तर अपघातातील जखमी तीन जणांना पुढील उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उपचारार्थ हलवले. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली टुणकी बीट जमादार मोहन पवार हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...