आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव जाणाऱ्या ट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच ट्रकला आग लागली होती. ही घटना आज ४ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नांदुरा-मलकापूर महामार्गावरील हॉटेल सह्याद्री जवळ घडली.
नांदुऱ्याकडून आर ६६/ ए / ४४०३ या क्रमांकाचा ट्रक मलकापूर कडे जात होता. तर विरुध्द दिशेने आर जे ६६/ ए / ६२३३ या क्रमांकाचा कंटेनर मलकापूर कडून नांदुर्याकडे येत होता. नांदुरा मलकापूर मार्गावरील हॉटेल सह्याद्री जवळ येताच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, या अपघातात ट्रकचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला होता. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला असुन दुसरा गंभीर जखमी आहे.
गंभीर जखमीला उपचारासाठी प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी खामगाव येथे हलवण्यात आले आहे. अपघात घडताच ट्रकला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळवले. वृत्त लिहिपर्यत मृत चालक व जखमीचे नाव कळू शकले नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.