आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:सप्तश्रृंगी महिला अर्बनतर्फे जानेफळ येथे आरोग्य शिबिर ; माधुरी पवार यांच्या संकल्पनेतून गरजूंवर उपचार

जानेफळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जानेफळ व परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा व्हावी या उदात्त हेतूने माधुरी देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून आणि सप्तशृंगी महिला अर्बन यांच्या वतीने जानेफळ येथे १२ जून रोजी भव्य आरोग्य शिबिर, रुग्णांना मोफत औषध व चष्मे वाटप तसेच स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी कॉल्पोस्कॉपी तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेत आयोजित या शिबिराचे उद्घाटन प.पू.परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर या आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमय आर. कोडलिकेरी, बालरोग चिकित्सक डॉ. राहुल भराड, जनरल फिजिशियन डॉ.शैलेष पळसकर, जनरल फिजिशियन डॉ. उमेश मालू, आहार तज्ञ डॉ.सागर झाल्टे, नेत्र तज्ञ डॉ. संजय ठोकरे इत्यादी डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे. या आरोग्य शिबिरात ज्या रुग्णांना छातीत दुखणे, जळजळ करणे, श्वास घेण्यास त्रास होणे इ.,रक्तदाब तपासणी, उंची व वजन, ई.सी.जी.,स्तनातील गाठ/वजनातील अनपेक्षित घट, स्त्री रोग तज्ञांव्दारे रुग्णांच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, अंगावरून पांढरे पाणी जाणे, अतिरिक्त स्त्राव, पाळी थांबल्यावर रक्तस्त्राव, अंग बाहेर येणे, गर्भ निरोधक उपाय, गर्भ व्यंग यासह सर्व स्त्री व प्रसूतिरोग उपचार या सर्व आरोग्य विषयी समस्या असलेल्या रुग्णांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नेत्ररोग तपासणी करून निदान व उपचार यावेळी करण्यात येणार आहे. रुग्णांची मोफत नाव नोंदणी, तपासणी नंतर मोफत औषधी, स्त्रियांसाठी कोल्पोस्कोपी तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शिबिरासाठी कोडलिकेरी मेमोरियल हॉस्पिटल, औरंगाबाद तथा व्यंकटेश नेत्रालय मेहकर यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तरी परिसरातील जनतेने या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सप्तशृंगी महिला अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष देवानंद पवार, अध्यक्षा माधुरी देवानंद पवार, उपाध्यक्षा संगीता विष्णू वाकळे, व्यवस्थापक सुभाष सिताराम खरात संचालक मंडळ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...