आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:परिचारिका दिनापासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; जागतिक परिचारिका दिना पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे

मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या परिचारिका दिना पासून आरोग्य कर्मचारी हे काम बंद आंदोलन करणार आहे. दरम्यान, प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २३ मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मेहकर तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचाऱ्याच्या गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे. परंतु जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी यांच्या मागण्या अजून पर्यंत सुद्धा प्रलंबित आहेत.जिल्हा परिषद प्रशासनाच्या सापत्न वागणुकीमुळे संतप्त झालेल्या आरोग्य कर्मचारी यांनी नाइलाजास्तव जागतिक परिचारिका दिना पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनात आरोग्य सेवक, सेविका १३ मे पासून कोणतेही इंजेक्शन किंवा नीडल हातात घेणार नाहीत व टोचणार नाहीत. आरोग्य सहाय्यीका व सहाय्य्क कोणतेही अहवाल देणार नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात सर्व प्रकारचे कोविडसह लसीकरण बाधित होणार आहेत. बाविस जिल्हा परिषद प्रशासनाचे आरोग्य कर्मचारी प्रति असलेले वेळकाढू धोरण जबाबदार असणार आहे.तदनंतर सुद्धा मागण्या निकाली न निघाल्यास २३ मे पासून जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच कार्यक्षेत्रातील कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा शेषराव पऱ्हाड, निरंजन धायडे, रवींद्र साठे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...