आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ प्रतीक्षाच:अतिवृष्टी; नुकसानीचे पंचनामे झाले, मदत कधी मिळणार

बुलडाणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे खरीप उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन ४४ कोटी ३४१ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार ६३२ शेतकरी बाधित झाल्याचा अंदाज आहे. आता भरपाई पोटी शासनाकडून अपेक्षित रकमेचा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा १२० टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै ते सप्टेंबर दरम्यान दोन लाख हेक्टर पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले. सोंगणीच्या काळातच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले. शेतीबरोबरच गूरे, ढोरे, रस्ते यांचेही देखील नुकसान झाले. जिल्ह्यात १० ऑक्टोबर महिन्यात धोधो पाऊस झाला. मेहकर मंडळात १०७ मि.मी.,नायगाव मंडळात १०७मि.मी. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात १०५ मि.मी.पाऊसाची नोंद झाली.

या अतिवृष्टीमुळे या दोन तालुक्यातील सुमारे १९ हजार ६५ हेक्टर आर पिकांचे नुकसान झाले असून याबाबतची माहिती पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतली. या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले. तर प्रशासनाकडून दहा दिवसात पंचनामे पूर्ण होतील असे सांगण्यात आले. दरम्यान महिना उलटून गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांना वेग आला.

परंतु शेतात पाणी साचल्याने पंचनामे पूर्ण करण्यास विलंबाने झाला. त्यामुळे खरीप हंगाम पाण्यात गेला. गत दोन तीन वर्षांपासून परतीचा मुसळधार पाऊस व शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस अक्षरशः हिसकावून घेत आहे. शेतकऱ्यांनी मोलामहागाचे बियाणे, खते,

दोन तालुक्यातील १९ हजार ६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
बुलडाणा जिल्ह्यात १० ऑक्टोबर रोजी धोधो पाऊस झाला होता. यावेळी मेहकर मंडळात १०७ मि.मी.,नायगाव मंडळात १०७ मि.मी. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात १०५ मि.मी.पाऊसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे मेहकर व लोणार या दोन तालुक्यातील सुमारे १९ हजार ६५ हेक्टर आर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. परतीचा या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...