आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके भुईसपाट:दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

बुलडाणा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून रात्री विजेच्या कडकडाटासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कपाशीसह इतर पिकांचे नुकसान होत आहे. ज्ञानगंगा, पूर्णेला पूर आला असून वीज अंगावर पडल्याने चार जनावरे दगावल्याच्या घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे. नुकतेच शासनाने जून ते ऑगस्ट पर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मंजुर करत नाही तोच अतिवृष्टीला सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अजून नुकसानीचा अंदाज घेण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्हयात ११ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत महावेध पोर्टलवरुन घेतलेल्या नोंदीनुसार ३४.६ मि.मी इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस संग्रामपूर तालुक्यात ७२.७ तर नांदुरा तालुक्यात ४९.१, बुलडाणा ४८.८ मिमी इतका झाला आहे.शेगाव येथे ४८.२ मिमी तर जळगाव जामोद ४०. ५, खामगाव ४०.३, मोताळा ३२.२, मलकापूर २६.३, मेहकर २२.२, चिखली २१.१, देऊळगाव राजा २०.६, सिंदखेड राजा १७.८, लोणार ९.८ मिमी पाऊस पडला आहे. विजेच्या कडकडाटासह पडलेल्या या पावसामुळे नांदुरा तालुक्यातील खेर्डा गावातील एका शेतकऱ्यांचे तीन बैल दगावले आहे तर निमगाव येथेही एक बैल मृत पावला आहे. सर्वाधिक पाऊस घाटाखालील भागात झाल्याने कपाशीचे माेठे नुकसान झालेले आहे.

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी
यंदा मी पाच एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. पाऊस व पोषक वातावरणामुळे कपाशीचे पीक चांगलेच बहरले होते.परंतु दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने कपाशीचे पीक पूर्णता उद्ध्वस्त झाले आहे. शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
-चंद्रसिंग तेजराज बोराडे, शेतकरी, पोरज

अहवाल शासनाकडे पाठवून कारवाई करू
तलाठी, कृषी सहाय्यकाचा पीक नुकसान पाहणीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर हा अहवाल शासनाकडे पाठवून, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
-अतुल पाटोळे, तहसीलदार

बातम्या आणखी आहेत...