आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके वाहून गेल्याची भिती:जांभोरा शिवारात अतिवृष्टी, खरीपाच्या पिकांची नासाडी

सिंदखेडराजा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोयंदेव, जांभोरा, पांगरी उगले फाटा या चार ते पाच किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात २९ जुलै, शुक्रवारी रोजी दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे परिसरातील पिकांची नासाडी होऊन काही भागातील पिके वाहून गेल्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे.

शुक्रवारी दिवसभर वातावरण निरभ्र असतानाच दुपारी अचानक ४ च्या सुमारास ढग दाटून आले. सोयंदेव, जांभोरा, सोनुशी आदि परिसरातील अवघ्या चार किलोमीटर परिघात एकाएकी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले व छोट्या नद्यांना पूर आला. जांभोरा गावानजीक असलेल्या पुलावरून पाणी गेले. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना आपली वाहने वळवून, पिंपरखेड मार्गे सावखेड तेजन येथून घरी परतावे लागले. अवघ्या चार किलोमीटर परिघात झालेल्या या पावसामुळे उशीरा पेरणी झालेली खरिपाची पिके खरडून वाहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...