आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान:सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

सिंदखेडराजा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच तालुक्यात हजेरी लावून मुसळधार सुरूवात करून दिली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले असले तरी काही ठिकाणी शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुक्याच्या उत्तरेकडील मराठवाड्याला लागून असलेल्या सोनोशी, जांभोरा, रुम्हणा, सोयंदेव, देवखेड, वर्दडी, बुट्टा, धानोरा, चांगेफळ यासह इतर गावांत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तासांपेक्षा जास्त पाऊस कोसळला. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेत, पुन्हा त्याच भागात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथून सुरू झालेला पावसाचा आक्रमक प्रवास दुसरबीड ते सिंदखेडराजा आणि दुपारनंतर तेथून सरळ साखरखेर्डा परिसरात पोहोचला. त्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी पिकांना जीवनदान मिळाले तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी कृषी, महसूल, पंचायत आदी विभागांनी दखल घेत नुकसानीचा सर्व्हे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नुकसानीचा सर्व्हे करण्यात यावा
मुसळधार पावसाने सायंकाळपर्यंत मुक्काम ठोकल्याने नदी, नाले एक होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नुकसानीचा अंदाज येत नाही. परंतु तालुक्यात जेथे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तेथील नुकसानीचा सर्व्हे तातडीने करण्यात यावा -दीपक कायंदे, पोलिस पाटील, सोयंदेव

बातम्या आणखी आहेत...