आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून होणारी जड वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार या मथळ्याखाली दैनिक दिव्य मराठीने ९ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. उशीरा का होईना या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी नियमानुसार जड वाहनास शहरात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह सकाळीच माॅर्निंग वॉक करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातून सर्रास जड वाहतूक करण्यात येत होती. या वाहतुकीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत कित्येकांचे बळी गेले असून अनेकांना अपंगत्व आले आहे. या बाबत दैनिक दिव्य मराठीने ९ मे च्या अंकात शहरातून होणारी जड वाहतुक अजून किती जणांचा बळी घेणार, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने जड वाहनांना शहरात दिवसा प्रवेश बंदी केली आहे. ही प्रवेश बंदी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने करण्यात आल्याचे स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे दोन विद्यार्थ्यांसह अनेकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. दोन विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर पोलिस व महसूल प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने शहरातील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरात रहदारीला अडथळा करणारे दुचाकी स्वारांवर सुद्धा पोलिसांचा कारवाईचा दंड पडणार आहे. रस्त्यावर गाड्या उभ्या करून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
जड वाहतूक बंद करण्यामागे अनेकांचा मोलाचा वाटा शहरातील जड वाहतूक बंद व्हावी यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी दैनिक दिव्य मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. आंदोलनाचे इशारे सुद्धा दिले होते. खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर यांनी शहरातील जड वाहतूक बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. युवा सेनेचे ऋषिकेश जाधव यांनी सुद्धा निवेदने दिले होते. तर माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून जड वाहतूक बंद होण्यामागे वाटा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.