आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाहकचा भूर्दंड:बुलडाणेकरांवर हेल्मेटची सक्ती!; नियम शिकवण्याऐवजी प्रशासन करणार जागृती

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन १८९२ साली नगर पालिकेची स्थापना झाली तेव्हा नगर पालिकेचा विस्तार अवघा १२ मैल इतका होता. आजही असलेल्या विस्तारात लोकसंख्या वाढली आहे. १२ हजार नळ जोडण्या शहरात व लगतच्या सागवन परिसरात आहे. शहरात रहदारीचे सहा चौक आहेत व या सर्व चौकात पोलिस नसताना हेल्मेट सक्तीच्या दिशेने प्रशासनाने पाऊल टाकले टाकले आहे. त्या दृष्टीने आज जनजागृतीला सुरुवात केली आहे. खरंतर आधी नियम शिकवण्याची गरज आहे.

हेल्मेट सक्तीच्या दिशेने प्रशासन पाऊल उचलत असले तरी अजून शहरात तरी हेल्मेट वापरण्याइतकी अपघाताची परिस्थिती नाही. मोजकेच संगम चौक, जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक, तहसील चौक, स्टेट बँक चौक व जिजामाता क्रीडा संकुल कडील मार्ग हे रहदारीचे आहेत. शहराबाहेर धाड नाका, त्रिशरण चौक असे रहदारीचे मार्ग आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्ती गावाबाहेर करण्याऐवजी शहरात करण्यासाठीचे प्रशासनाचे पाऊल जनजागृतीच्या दिशेने पडले आहे. बुलडाणा शहरातील स्टेट बँक चौक वगळता वाहतूक पोलिस फक्त पावत्या फाडण्याकरता एकत्र उभे असलेले दिसतात. बहुतांश वेळा पोलिस स्टेशनसमोरच वाहने अडवून दंडात्मक वसुली केली जाते.

वाहन घेताना हेल्मेटची सक्ती : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने वाहन विक्री करणाऱ्या दुकानांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. कारण दुचाकी वाहन खरेदी करताना हेल्मेट घेण सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीकडे हेल्मेट आहे.त्यालाही बळजबरी हेल्मेट विकून पैसा कमावण्याचा व्यवसाय शहरात सक्तीने सुरु झाला आहे.

नाहक हजार रुपयांचे हेल्मेट घेऊन घरी ठेवण्याची ही वेळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वचक नसल्याने निर्माण होत आहे. वास्तविक गाडी पासिंग करतांना हेल्मेट घालून येणे सक्तीचे आवश्यक आहे. मात्र दलालांमार्फत सर्व होत आहे, त्यामुळे काहींना हेल्मेट नसले तरी पासिंग होत आहे

बातम्या आणखी आहेत...