आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:दोन्ही मुलांना उच्च शिक्षण; हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शिक्षण देत सुनीता पाटील यांनी मुलांना घडवले

मोताळा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर पंचायतमध्ये कार्यरत महिला कर्मचारी सुनीता पाटील यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले असून त्यापैकी मोठा मुलगा वैभव पाटील हा एसआरपीएफ पोलिस दलात कार्यरत असून दुसरा मुलगा सुद्धा पोलिस दलात जाण्याची तयार करत आहे. कठीण परिस्थीतीही दोन्ही मुलांना दिलेले शिक्षण आणी त्यांच्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाचे फळ मिळत असल्याचा आनंद सुनीता पाटील यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

बुलडाणा माहेर असलेल्या सुनीता पाटील यांच्या माहेरची परिस्थिती सर्व साधारण आहे. जवळपास तेहतीस वर्षांपूर्वी त्यांचे लग्न जळगाव खान्देश येथील लक्ष्मण पाटील यांच्यासोबत झाले होते. सुनीता पाटील, लक्ष्मण पाटील यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे पंधरा वर्षांपुर्वी ते विभक्त झाले. तेथूनच सुनीता पाटील यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. चाळीस रुपये रोज, त्यामध्ये मुलांचे पालनपोषण करून त्यांना शिक्षण देणे ही चिंता त्यांना सतावत होती. परंतु त्यांनी हार न मानता परिस्थितीचा सामना करण्याचे ठरविले.

मेहनतीच्या जोरावर त्यांनी अथक परिश्रम घेत आपल्या मुलांचे पालनपोषण करून त्यांना उच्च शिक्षण दिले. त्यांनी घेतलेल्या कष्टाचे त्यांच्या मुलांनी चिज केले. आयुष्यात केलेल्या संघर्षाला त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या कष्टाला पाहून त्यांच्या मुलांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षणात मेहनत घेतली.

त्यांचा मोठा मुलगा वैभव पाटील यांस औरंगाबाद येथील कारागृहात पोलिसात तर एसआरपीएफ पोलिस नागपूर येथे भरतीचे पत्र आले होते. परंतु त्यांनी नागपूर येथे एसआरपीएफ पोलिस पदी नियुक्ती स्वीकारली आहे. दुसरा मुलगा सुध्दा पोलिस दलात जाण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे सुनीता पाटील यांनी पाहिलेले स्वप्न मुलाने पूर्ण केले असल्याने त्यांनी केलेल्या संघर्षाचे, मेहनतीचे फळ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

बातम्या आणखी आहेत...