आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा यशस्वी‎:कृषीपूरक क्षेत्रात कामगिरी‎ करणाऱ्या महिलांचा सन्मान‎

बुलडाणा‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना स्वायत्तता, सुरक्षा, संरक्षण‎ देण्यासाठी तसेच महिला सबलीकरणाचे‎ अभियान राबविण्यासाठी, स्त्री शक्तीची‎ जाणीव सांगण्याचे उद्दिष्ट म्हणजे विज्ञान‎ केंद्र बुलडाणा येथे घेण्यात येत असलेला‎ हा मेळावा असल्याचे प्रतिपादन विशेषज्ञ‎ पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ.नरेंद्र‎ देशमुख केले. याप्रसंगी कृषि विज्ञान‎ केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त दि.८‎ मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन‎ करण्यात आले. कार्यक्रमाचे‎ अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राच्या‎ विशेषज्ञ डॉ. सुकेशनी वाणे यांची तर‎ प्रमुख अतिथी व्यवस्थापक वर्षा गवई ह्या‎ होत्या.‎ यावेळी कृषिपूरक व्यवसाय क्षेत्रामध्ये‎ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्योती‎ मोरे महिलेचा सत्कार करण्यात आला.‎ त्यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचे‎ मार्गदर्शनाखाली व्यवसाय निर्मितीचे‎ स्वानुभव कथन केले.

तर कृषी‎ अभियांत्रिकी डॉ.सुकेश्नी वाणे यांनी‎ महिला सशक्तीकरणासाठी बचत गटाचे‎ महत्त्व, महिलांची शेतीमधील निर्णायक‎ भूमिका काळाची गरज असल्याचे त्यांनी‎ सांगितले. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात‎ उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषि तंत्र‎ विद्यालयाच्या सुविधा शिंदे, रुपाली‎ लोखंडे या विद्यार्थिनींचा सत्कार‎ करण्यात आला. तर प्रतीक्षा चराटे या‎ विद्यार्थिनीने महिला सबलीकरण गीत‎ गायन तर गुंजन अंभोरे हिने कविता सादर‎ केली.

यावेळी सत्कार मूर्तींना कृषी‎ संवादिनी व कृषी दिनदर्शिका भेट देण्यात‎ आल्या. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र येथील‎ सर्व कर्मचारी, कृषी तंत्र विद्यालयाच्या‎ आशा काळे, नूतन मानापुरे व कृषी तंत्र‎ विद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.‎ प्रस्तावना गृहविज्ञान कृतिका गांगडे यांनी‎ केली. कार्यक्रमाचे संचालन कृतिका‎ गांगडे यांनी केले. यावेळी कृतिका गांगडे,‎ डॉ.सुकेश्नी वाणे, प्रवीण देशपांडे,‎ डॉ.नरेंद्र देशमुख, डॉ.मनेष येदुलवार,‎ कोकिला भोपळे, रणजीत सदार, लक्ष्मी‎ भाकरे, भूषण रावे यांनी कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...