आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा आज, दि. ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते योगेश म्हस्के यांच्या वतीने सावता भवनात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी होते. ठाणेदार केशव वाघ, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, शिवाजी राजेजाधव, राजेश बोंद्रे, नंदू वाघमारे, छगन झोरे, अनिकेत इंगोले, मिलिंद सावंत, अॅड. अतुल हाडे, उल्हास भुसारे, मुकुंद पाठक, अक्षय ठाकरे, बबन मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सुंदराबाई जाधव, माजी उपनगराध्यक्षा रुखमनबाई तायडे, प्राचार्य हजरा काजी, नगरसेवक सारिका मेहेत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता बिराजदार, कीर्तनकार ज्योती जाधव, अॅड. वर्षा कंकाळ, वैद्यकीय अधिकारी सुरेखा पवार, स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या पदाधिकारी डॉ. किरण म्हस्के, डॉ. मंजूषा खुरपे, शुभांगी मगर, कविता मिनासे, सोनिया खरात, प्रतिभा तायडे, डॉ. रजनी म्हस्के, अरुणा चौधरी, सविता गाणार यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. नाझेर काझी यांनी यावेळी महिलांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे सांिगतले. कुटुंब सांभाळून महिला करत असलेल्या प्रत्येक कामात आम्ही सोबत आहोत.
छोटे-छोटे उद्योग उभारून तरुणींच्या हाताला काम दिल्यास भविष्यातील पिढी अधिक सक्षम होईल, असे ते म्हणाले. शेती हादेखील व्यवसाय असून या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी महिलांसाठी सहकारी पतसंस्था सुरू केल्यास त्या माध्यमातून छोटे उद्योग उभारले जाऊ शकतात. त्यासाठी शहरातील कर्तृत्ववान महिलांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील महिलांची मोठी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.