आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील टापरे नगरातील अलोक दुसाद यांचे घर अज्ञात आरोपीने फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून असा एकूण अकरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरात दिवसेंदिवस लहान मोठ्या चोऱ्यांच्या घटना मध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न शहरवासीयांना पडू लागला आहे.
येथील जलंब रोड वरील टापरे नगरात राहणारे आलोक प्रदीप दुसाद हे परिवारासह लग्न-समारंभासाठी १५ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट फोडून त्यात असलेले ८ लाख रुपये व ३ लाख १० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. ही घटना १६ डिसेंबर रोजी दुसाद हे घरी परतल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांना दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यामुळे त्यांच्या मनात चोरी झाल्याचा संशय आला.
यावेळी त्यांनी घरात जावून बघितले असता त्यांना कपाट उघडे दिसून आले व सामान अस्ताव्यस्त आढळून आले. त्यांना कपाटातील रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.