आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रहिवासी शेख आरिफ शेख भिकन यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, बकरीच्या पिल्याचाही जळून कोळसा झाला आहे. या घटनेत घर मालकाचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये शेख आरिफ शेख भिकन यांचे टिनपत्र्याचे घर आहे. हमाली करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान शनिवारी सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली.
लाकुडफाट्याचे घर असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले हाेते. या आगीत घरातील जीवनोपयोगी साहित्य, रोख रक्कम, वर्षभरासाठी राखून ठेवलेले तीन हजार रुपये किमतीचे दोन क्विंटल गहू, १२ हजार रुपये किमतीचे दोन क्विंटल सोयाबीन, एक फ्रीज, कुलर, पलंग, कपाट, कटर मशीन जळून खाक झाली. या आगीत बकरीच्या पिल्लाचा भाजून अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेमुळे शेख आरिफ यांचा संसार उघड्यावर अाला. आगीची माहिती मिळताच तलाठी चव्हाण तसेच ग्रामविकास अधिकारी संदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नुकसानग्रस्तास शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.