आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावी पेपर फुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्याचे समोर आले आहे. या परिक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रूपये घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
कशी झाली पेपर फुटी?
बुलढाण्यात झालेल्या बारावी पेपर फुटी प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 99 जणांचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचे उघडकीस आले. या ग्रुपमध्ये शिक्षक, काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा संबंधित व्हॉट्सॅप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु आहे. सायबर सेलकडून डिलीट करण्यात आलेल्या डेटा लवकरात लवकर रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पेपरफुटीचे धागेदोरे मुंबईपर्यंत
बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून पेपर बारावीचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. याबाबबत दोन शिक्षकांचाही समावेश आहे.या दोन शिक्षकांसह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पेपरफुटीचे धागेदोरे मुंबईपर्यंत सापडले आहेत. शनिवारी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गणिताच्या पेपरच्यावेळी कॉपी करताना पकडण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.