आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील केदार यांचे प्रतिपादन:मानवसेवा, प्राण्यांवर प्रेम करणारी माणसे सर्वच घटकांना न्याय देणारी; चिखली येथे शंकरपटाचा बक्षीस वितरण समारंभ

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आपल्या कल्पक व दूरदृष्टीतून सतत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन लोकाभिमुख व अग्रेसर असणार राहुल बोंद्रे सारख नेतृत्व सर्वांनी जोपासले पाहिजे. मानवसेवेचे सोबतच प्राण्यांवर प्रेम करणारी माणसे सामाजातील सर्वच घटकांना न्याय देणारी असतात, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केले. चिखलीत शहर काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित शंकरपटात १२८ बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभात क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी बोंद्रे यांच्या कार्याचा गौरव करताना उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी आमदार संजय गायकवाड, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, श्यामभाऊ उमाळकर, दिलीपराव जाधव, समाधान सुपेकर, अतहरोद्यीन काझी, किशोर सोळंकी, शरद हाडे, महिला धुरकरी सीमा पाटील नारायणगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी ना.केदार बोलताना पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील विकास व नेतृत्वाच्या बाबतीत बऱ्याचदा बोलल्या जाते तर, मराठवाड्यात ज्या प्रकारे नेतृत्व जोपासल्या जात आहे, त्याच पध्दतीने विदर्भात सुध्दा लोकाभिमुख असलेले राहुल बोंद्रे सारख नेतृत्व जोपासल्या गेल पाहीजे. त्यासाठी आजच संकल्प करा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहुल बोंद्रे यांच्या सारख नेतृत्व पुन्हा एकदा आमदार झाले पाहीजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिषय पारदर्शक कारभार करत असल्याचे सांगुन राज्यात बंद असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सर्व प्रथम बैठक लावुन बैलगाड्या शर्यतीचा अडथळा दूर केला. त्याचा प्रत्यय मला आज याठिकाणी उपस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहणारा आनंद पाहुन समाधान होत आहे. दरम्यान, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार दिलीप सानंदा, श्यामभाऊ उमाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी तब्बल २ लाख रुपयांच्या बक्षिसाची लूट करण्यात आली. यात जनरल व गावगाडा असे दोन गट करण्यात आले होते. त्यात जनरल गटामध्ये ४१ हजार रूपयांचे प्रथम बक्षीस डॉ. नांदुरकर पुलगाव जिल्हा वर्धा यांना, द्वितीय ३१ हजार रूपयांचे बक्षिस दादाराव पाटील पसळसखेड जळगाव जामोद, यांना तर २१ हजार रूपयांचे तृतीय बक्षीस शरद हाडे सवणा ता. चिखली यांना देण्यात आले. तर गावगाडा गटामधून प्रथम बक्षीस १५ हजार रूपये जीवन इंगळे शेलुद ता. चिखली यांना, द्वितीय ११ हजार रूपये रामप्रसाद राठोड बैतुल एम.पी. यांना तर तिसरे बक्षिस ९ हजार रूपये जनार्दन कुऱ्हाडे सोनाटी ता. मेहकर यांना देण्यात आले. दोन्ही गटांना प्रत्येकी १३ बक्षिसे असे एकूण २६ बक्षिसे देण्यात आली.

शंकरपटाच्या आयोजनासाठी कुणाल बोंद्रे, रफिक कुरेशी,किशोर कदम, विजय गाडेकर, सुरेंद्र ठाकुर, आशिष बोंद्रे, शहेजादअली खान, सचिन बोंद्रे, दिपक खरात, विलास चव्हाण,राजु मनदाडे यांचे सहकार्य लाभले. तर शरद हाडे, सचिन शेटे, योगेश जाधव, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, तुषार भावसार, शेख जाकीर, मोहित घुगे, हानी सोनवाल, आश्विन जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. प्रमुख उपस्थितीत नंदु सवडतकर, दिपक देशमाने, डॉ. इसरार, नगरसेवक रफिक सेठ, हाजी रउफभाई, दीपक खरात, मोहंमद आसिफ, राजू रज्जाक, गोकुळ शिंगणे, विलास कंटुले, विजय गाडेकर, गोपाल देव्हडे, दिपक थोरात, प्रदीप पचेरवाल, कैलास खराडे, नीलेश अंजनकर, राहुल सवडतकर, जय बोंदे, अविनाश सावजी, मोहन खंडेलवाल, डिगांबर देशमाने, बाळु बोंद्रे, शहेजादअली खान, अंबादास खरात, सुचित भराड,बिदुसिंग इंगळे, बंटी सुरडकर, यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

बातम्या आणखी आहेत...