आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वावर विश्वास:शेकडो शिवसैनिकांनी सादर केले शपथपत्र

खामगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, संपर्क प्रमुख दत्ता पाटील व प्रा.अनिल अमलाकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकतेच शिवबंधन बांधणारे रवि महाले यांच्या सह हरिदास हुरसाड, अनिल अंमलकार, सुभाष खारोडे, विजय इंगळे, सुभाष ठाकूर, बंडू बोदडे, देविदास उमाळे, आनंद चिंडोले, श्रीराम खेलदार, प्रमोद कव्हडे, चंचलेश जाधव, गजानन माने, सुरज बेलोकार, संतोष सावंग, भारती चिंडोले यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी ५ ऑगस्ट रोजी मातोश्रीवर जात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून आम्ही आपल्या सोबत आहोत असे शपथपत्र भरुन दिले. यावेळी शिवसेनेचे नेते विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, नितीन नांदगावकर, अरविंद सावंत, अरविंद नेरकर, रवींद्र कुदाळकर आदी उपस्थित होते.यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनिल अंमलकार व रवी महाले यांच्याकडून खामगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या कार्याची माहिती जाणून घेतले. गाव तेथे शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...