आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन लष्कर भरतीसाठी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरोधात तरूण रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, आज शनिवारी येथील उपविभागीय अधिकारी यांना स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने निवेदन देवुन भारताचे सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात आणणारी अग्निपथ योजना रद्द करावी, अशी मागणी केली आहे. उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेली नवीन लष्कर भरती अग्निपथ योजना ही देशासाठी आपत्ती आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी आहे. त्यातच सरकारने मागील दोन वर्षांपासून नियमित लष्करी भरती केली नाही. त्यामुळे २०२१ पर्यंत भारतीय सैन्यात १ लाख ४ हजार ६५३ जवानांची कमतरता होती. ही पदे भरण्याऐवजी सरकारने आता प्रादेशिक कोटा पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय चुकीचा आहे. निवेदन देताना तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.