आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:फसवणूक करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी उपोषण; आरोग्य मंत्र्याकडे तक्रार

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फसवणूक करणाऱ्यासह गहाळ झालेल्या बिलाच्या फाइल्सची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी चिखली येथील राजेश वाहुरवाघ यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, कोरोना काळात चिखली येथील जेईडी एंटर प्रायजेसने ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या योजनेंतर्गत गाव खेड्यातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली. कोरोनाचे लक्षण दिसून येताच त्या रुग्णाला कोविड सेंटरला पाठवण्यात येत होते. ही योजना राबवण्यासाठी वाहुरवाघ यांनी बीड येथील गणेश वाघमारे यांच्या समर्थ टेक्नॉलॉजी व विराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत रितसर करार करून घेतला होता. ही योजना घेण्यासाठी त्यांनी विराज संस्थेला 15 लाख रुपये दिले होते. त्यावेळी वाघमारे व त्यांच्या संस्थेने प्रति घर 25 रुपये मानधन देण्याचे ठरले होते. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी पाच महिने काम केले. परंतु, वाघमारे यांनी एक महिन्याचेही बिल दिले नाही.

त्यामुळे वाहुरवाघ यांनी 25 मे रोजी आरोग्य मंत्र्याकडे तक्रार दाखल केली. त्यावर आरोग्य मंत्र्यानी ही तक्रार टिपनीसह सचिवाकडे पाठवली. दरम्यान वाहुरवाघ यांनी तक्रारीची चौकशी केली असता ही फाईल गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या गणेश वाघमारेसह त्यांच्या संचालकांवर कारवाई करून गहाळ झालेल्या फाईलची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.