आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:जंगलात काळविटाची शिकार करून  300 रुपये किलो दराने मांस विक्री; दोन जणांना केली अटक, 8 एप्रिलपर्यंत सुनावली वन कोठडी

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरण, काळविटाची शिकार करून त्यांचे मास विकणाऱ्या आरोपींना वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून १५ किलो मादी काळविटाचे मांस जप्त केले. हे आरोपी परिसरातील गावात ३०० ते ३५० रुपये किलो दराने मांस विकायचे, अशा माहितीवरून ही कारवाई केली. या आरोपींनी १५ ते २० हरणांची शिकार केली असावी, असा अंदाज वनअधिकाऱ्यांना आहे. दोन्ही आरोपींना शुक्रवार ८ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

तालुक्यातील अकोट वनविभागाअंर्तगत जऊळखेड़ येथे काळविटाची शिकार करून दोन जण मांसविक्री करीत आहेत, अशी माहिती वनरक्षक सी. एम. तायडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून येथे कारवाई करून ज्ञानेश्वर गजानन जामेवार (रा. जऊळखेड़, ता. अकोट.) व सुजोश राधाकिसन मुंदाळे (रा. पाटी, ता. अकोट) या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून पोलिसांनी १५ किलो मांस जप्त केले. वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्याच्या मांसाची खरेदी- विक्री करणे हा गुन्हा आहे, असे असतानाही ज्ञानेश्वर, सुजोश या दोन शिकाऱ्यांनी अनेक वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे समोर येत आहे. वन कोठडीत त्यांनी किती हरणांची शिकार केली. ते कुणाला मांस विकायचे, अशी माहिती समोर येणार आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना, सहायक वनसंरक्षक सु.अ.वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवेंच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी आर. टी.जगताप, वनकर्मचारी सी. एम. तायडे, वनरक्षक ए. पी. श्रीनाथ, सोपान जी. रेळे, मोहन वानखडे, सोमंत रजाने, दीपक मेसरेंनी केली.

बातम्या आणखी आहेत...