आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण सर्वजण कामगार आहोत आपण विविध क्षेत्रात काम करतो म्हणून कामगार आहोत. या कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे होते त्यांना या कामगार दिनी विसरुन चालणार नाही. त्यांनी व महामानवांनी जे कार्य केले त्यामुळेच आपण आज येथे आहोत. महात्मा फुले शाळेचा प्रत्येक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केल्या जातो. त्यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊनच हे विद्यार्थी देशाची सेवा करतील यात शंका नाही, असे प्रतिपादन महात्मा जोतिबा फुले मराठी उच्च प्राथमिक शाळेचे अध्यक्ष प्रकाश वानरे यांनी केले.
महाराष्ट्र दिन, कामगार दिन व शैक्षणिक क्षेत्रासाठी निकाल दिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम १ मे रोजी शाळेच्या आवारात पार पडला या वेळी वानेरे बोलत होते. यावेळी ध्वजारोहण महात्मा फुले शाळा मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त स्नेहलता मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात बालवाडी पासून वर्ग १ ते ९ पर्यंत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शाळा समिती अध्यक्ष प्रकाश वानेरे होते. तर प्रमुख उपस्थिती ह.सू.पल्हाडे, पु. शा. सातव, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्षसुभाष मानकर, सचिव सुरेश चौधरी, कोषाध्यक्ष विश्वनाथ माळी, लक्ष्मीकांत बगाडे, बालक मंदिर अध्यक्ष आनंदराव मानतकर, महात्मा फुले कॉन्व्हेंट अध्यक्ष पं.पा.वाघमारे, भास्करराव बावस्कर, पा.नि. बोदडे, वाघमारे, पर्यावरण मित्र प्रदीप डांगे, हरिभाऊ कुडके, पर्यवेक्षक नरेश पेद्ये, प्रभारी मुख्याध्यापक पंकज राठोड उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांनीवर्गानुसार निकाल जाहीर केला. शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व येणाऱ्या शैक्षणिक सत्र २०२२-२३ चे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे व सर्व मान्यवरांच्या हस्ते बालवाडी ते वर्ग १ पासून ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पारितोषिके व बक्षिसे वाटप करण्यात आली. प्रमुख उपस्थितीतसुभाष मानकर यांनी आजच्या काळात शिक्षणाचे महत्व गरज व कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षक सुनील सुसर यांनी कामगार दिनानिमित्त बीजभाषण केले. कामगारांच्या समस्या सूचना व कामगारांचे जगामध्ये असलेले त्यांच्या कार्याचे योगदान नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पोटदुखे या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक, नागरिक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या शाळेतून पाखरं उडावीत, ‘आभाळभर शक्ती माणुसकीचे पंख असावेत गुरुजनांवर भक्ती’ या काव्य पंक्तींनी आभार प्रदर्शन गणेश सिंग जाधव यांनी सादर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.