आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:डोणगाव ग्रामसेवकावर कारवाई झाल्यास ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन

डोणगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोणगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांच्यावर कारवाई झाल्यास ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ८ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांना जयपाल हरीनारायण शर्मा व ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.डोणगाव येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांनी जनतेला चोर संबोधल्या प्रकरणी डोणगाव बंद ठेवण्यात आले होते व कारवाई ची मागणी होत होती. परंतु ८ जयपाल शर्मा व इतर नागरिकांनी गटविकास अधिकारी मेहकर यांना देत ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांच्या वर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी केली असून त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केल्यास डोणगाव ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.

गावकऱ्याच्या वतीने जयपाल शर्मा यांनी गटविकास अधिकारी हिवाळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, डोणगाव येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांच्या विरोधात काही लोकांनी बनावट कथीत व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमावर टाकून ग्रामसेवकावर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचे काम सध्यस्थितीत विरोधकांकडून होत आहे. ग्रामसेवक चनखोरे हे रुजु झाल्यापासून त्यांनी डोणगाव येथे अनेक विकासकामे केली आहेत. प्रशासकाच्या काळात त्यांनी ग्रामपंचायत विरोधातील अनेक न्यायालयीन प्रकरणे हाताळून ग्रामपंचायतला पाठबळ दिले आहे. तसेच जनहितासाठी कामे केली आहेत अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर आपल्या प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात येऊ नये. डोणगाव येथील बोटांवर मोजण्या इतक्याच विरोधकांनी या बनावट व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांना बदनाम करुन कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणामध्ये ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांच्या विरोधात काही कारवाई आपल्या कडून झाल्यास डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयास ताला ठोको आंदोलन करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...