आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​शिवसैनिकांचा मेळावा:जिवंत घरी गेलो तर घरच्यांचा, नाही तर बाळासाहेब ठाकरेंचा ; जालिंदर बुधवत यांचे प्रतिपदन

चिखली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक पत खालावली आहे. आज ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी भाषा वापरत आहेत. त्यामुळे सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे मी देखील घरच्यांना सांगून निघतो परत आलो तर तुमचा नाहीतर बाळासाहेबांचा. तेव्हा वाट बघू नका जिवावर उदार होऊन शिवसेनेचे काम करुन गद्दारांना धडा शिकवू, अशी भावना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केली. तर कार्यक्रमाला कुणी येत नाही म्हणून आमच्या कार्यक्रमात धुडगूस घालतात. ठेकेदारी कसे करतो अशा धमक्या देतात. पण मी आगामी काळात कमिशनसाठी कोण आमदार निधी वाटतो हे बाहेर काढल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही बुधवत यांनी दिला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, छगन मेहेत्रे ,उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, उप जिल्हा प्रमुख संजय हाडे, ,उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, तालुका प्रमुख लखन गाडेकर, संदीप मापारी, निंबाजी पांडव, दादाराव खार्डे, किशोर गारोळे, बुलडाणा शहर प्रमुख हेमंत खेडेकर, तुकाराम टाळपांडे,अनिल अमलकर,चिखली तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कराडे यांच्यासह चिखली तालुका, शहर शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र खेडेकर म्हणाले की, बुलडाणा येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रसंगी पूर्वनियोजित कट रचून कार्यक्रमस्थळी घातलेला धुडगूस कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठीच होता. या घटनेनंतर ज्यांनी हल्ला केला त्यांना शून्य मार्क मिळाले. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांनाच नाव बोट ठेवली. यावेळचे व्हिडीओ चित्रण असतानाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. सत्ता कशी राबवतात हे त्याठिकाणी जिल्ह्यातील तमाम जनतेने बघितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसला तरी जनतेने मात्र गुन्हा दाखल केला आहे आणि जनतेच्या न्यायालयात तपास नसतो डायरेक्ट न्यायच असतो आणि जनतेच्या न्यायालयात यांना शिक्षा ही मिळणारच असे सुद्धा खेडेकर यांनी सांगितले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. बुलडाण्याची घटना पहाता पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

लाटेवर आलेल्यांना आता कोणतीच लाट नाही स्व.दिलीपराव रहाटे यांनी ज्यांना मोठे केले जे आमदार मंत्री खासदार झाले ते आता लाचार झाले आहेत. मंत्रिपदाची भीक मिळेल म्हणून कटोरा घेऊन फिरत आहेत. खासदारांना ईडीची भिती असेल परंतु आमदार कशासाठी गेले काय गौडबंगाल आहे हे आता जगजाहीर झाले आहे. लाटेवर निवडून आलेल्यांना आता कुठलीच लाट कामी येणार नाही मला देखील गटात येण्यासाठी वारंवार निमंत्रण देणाऱ्यांना एकच सांगितले. माझी अंत्ययात्रा निघेल तेव्हा शिवसेनेच्या भगव्यात माझे प्रेत जाईल, असे सांगत आगामी काळात या गद्दारांना मतपेटीतून धडा शिकवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केले. याप्रसंगी वसंतराव भोजने, छगनदादा महेत्रे,आशिष रहाटे,दत्ता पाटील यांनी देखील आपल्या भाषणामधून खासदार, आमदारांचा समाचार घेतला.

बातम्या आणखी आहेत...