आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउदयनगर परिसरातील २५ ते ३० खेडे गावांतील शेत शिवारात २८ डिसेंबर रोजी झालेल्या गारपिटीमुळे तब्बल सात हजार शेतकऱ्यांच्या तीन हजार दोनशे हेक्टर वरील संत्रा,तूर गहू हरबरा, कांदा पपई यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल, कृषी तथा पंचायत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तसेच गटविकास अधिकारी यांनी वरीष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केले.
परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तेव्हा नुकसान भरपाई न मिळाल्यास १५ मार्च रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यामुळे उदयनगर परिसरातील शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय संघटनांच्या पुढाकारातून येत्या १४ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास न्याय हक्क मागण्यांसाठी १५ मार्च रोजी खामगाव चिखली राष्ट्रीय महामार्ग वरील उदयनगर चौफुली वर रास्ता रोको करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दोनशे शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मुरलीधर क्षिरसागर, चक्रधर लांडे, राम डहाके, मनोज लहुडकार, दिगंबर राऊत, महादेव ठाकरे, अमोल बोरपी, जितू पुरोहित,संतोष पाटील, किरण दानवे, अक्रम खासाब, राजू राठी, शे.रफिक, हेमंत परखेडे, राजेश बिडवे, ज्ञानेश्वर पाटील, संजय धुरंधर, अनिल अंभोरे, बंडू बिडवे, रवींद्र डाळिंमकर,आकाश राऊत,गणेश भगत,सुदाम बराटे, दत्ता चोपडे, दिवाकर कोरडे, पुरुषोत्तम अवचार,शे.फकिरा शे.उस्मान,विनोद बोरपी, लक्ष्मीकांत बराटे,गजानन काळे,महावीर जैन,शे.शब्बीर शे.करीम यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.