आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:खरंच स्वाभिमानी असाल तर राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा घ्या : शेळके

बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. खरंच स्वाभिमानी असाल तर राज्यपालांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. छत्रपती शिवरायांची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. यापूर्वी सुद्धा कोश्यारी यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय यांच्याबाबत असेच असभ्य वक्तव्य केले होते. मराठी माणसांबद्दलही कोश्यारी यांच्या मनात राग आहे. मुळातच भाजपचे अनेक नेते वारंवार अशी बेताल वक्तव्ये करतात. तर भाजप त्यांना पाठीशी घालण्याचे काम करते. खरे तर भाजपने महाराष्ट्राची माफी मागण्याची गरज आहे.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मीनल आंबेकर, आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा नंदिनी टारपे, प्रतीक्षा राजने, रेणुका सांगळे, संगीता हिंगे, रेणुका भाकडे, मीना गव्हाणे, सिंधु मोरे, स्मिता वऱ्हाडे, आम्रपाली कंकाळ, पूजा शेळके, वैष्णवी बोरसे, ज्योती सोनोने, रुपाली उबरहंडे, सोनाली वाघ, कीर्ती परिहार, संध्या सावळे, छाया खरे, प्रिया धंदर, मायावती नरवाडे, सुषमा लहाने, कविता पवार, ज्योती गायकवाड, वंदना मेढे, संगीता देशमुख, मीनाक्षी सिंगारकर, प्रीती जाधव, काजल जाधव, मयुरी जाधव, अनुश्री जाधव, गुरुचरण बिबने, अस्तिक वारे, व्ही. आर. चव्हाण, तानाजी पैठणे, पृथ्वी राजपूत, राजू शेळके, अनिल शेळके, समाधान शेठ, सागर तायडे, कार्तिक सवडतकर, गणेश शेळके, कृष्णा शेळके, अरविंद चव्हाण, अशोक गव्हाणे, नारायण काकडे, संदीप सावळे, अनिल सुरगडे, गोटू जाधव, सुभाष बुंधे, कृष्णा लांडगे, विठ्ठल देशमुख, योगेश बरडे, शुभम टेकाळे, अमोल कानडजे, केशव भोलाने, उमेश भागवत, गणेश आडवे, भागवत गव्हाणे, रामकृष्ण हिवाळे, पवन सावळे, विलास धंदर, चेतन धवणे, अरविंद इंगळे, गणेश नरोडे, उदय देशमुख, किशोर दारव्हेकर, विनोद चव्हाण, पवन सिरसाट, जगन्नाथ उबरहंडे, आदिनाथ यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान नसणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा; राष्ट्रपतींकडे मागणी राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. कोश्यारी यांना या पदाचे महत्व नाही. त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आपण कुणाबद्दल बोलावे, काय बोलावे, कसे बोलावे याविषयी त्यांना भान नसते. उठसूठ वाद ओढवून चर्चेत राहण्याची त्यांना सवय झाली आहे. ज्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान करता येत नाही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा आणि राज्यपालांचा राजीनामा घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जयश्री शेळके यांनी राष्ट्रपतींकडे केली.

बातम्या आणखी आहेत...