आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळी, रंगपंचमी सणानिमित्त खेड्यापाड्यात अवैध दारू पोहोचवल्या जात असल्याची माहिती एएसपी श्रवण दत्त यांच्या पथकाला मिळाली. यावरून पोलिसांनी तालुक्यातील पिंप्री गवळी फाट्यावर सापळा रचून एकास ताब्यात घेवून देशी दारुच्या ४०८ बाटल्या व एक स्कूटी असा एकुण ६३ हजार ७२० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज १७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे .
तलफ भागवण्यासाठी शहरातून ग्रामीण भागात अवैधरीत्या देशी दारुचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पथकाने पिंप्री गवळी फाट्यावर सापळा रचला. काही वेळानंतर पथकाला गणेश प्रल्हाद घोडके वय३५, रा रेखा प्लॉट खामगाव हा स्कूटीने येताना दिसून आला. यावेळी पोलिसांनी स्कुटीची झडत घेतली असता त्यामध्ये अवैध देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या ४०८ बाटल्या व स्कूटी असा एकूण ६३ हजार ७२० रुपयांचा माल जप्त केला.
घटनास्थळ हे खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आरोपीस ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गजानन बोरसे, नापोकॉ गजानन आहेर, रघुनाथ जाधव, संदीप टाकसाळ यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.