आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाकडांची वाहतूक‎:लाकडांची अवैध वाहतूक करणारे वाहन‎ पकडले; बेलुरा शिवारातील घटना‎

मोताळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरित्या लाकडांची वाहतूक‎ करणारे डीसीएम वाहन वनविभागाने‎ पकडले आहे. ही कारवाई २ फेब्रुवारी‎ रोजी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या‎ सुमारास बेलोरा शिवारात करण्यात‎ आली आहे. यावेळी वन‎ कर्मचाऱ्यांनी डीसीएम वाहनासह ८९‎ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.‎ प्रकरणी पाच जणांविरुद्ध वनगुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎

बेलुरा शिवारातून अवैध लाकडांची‎ वाहतूक होत असल्याची माहिती वन‎ कर्मचाऱ्यांना मिळाली. या‎ माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी‎ नेहा मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ एक पथक तयार करण्यात आलेले. हे‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पथक संध्याकाळी साडे पाच‎ वाजेच्या सुमारास बेलुरा शिवारात‎ गेले असता त्यांना अवैधरीत्या‎ लाकडांची वाहतूक करतांना एम.एच.‎ १२/ क्यू/ ६८४३ या क्रमांकाचे‎ डीसीएम वाहन दिसून आले.

त्यानंतर‎ पथकाने ६० हजार रुपये किमतीचे‎ वाहन व २९ हजार रुपये किमतीचे‎ लिंबाचे लाकडे व जळतन असा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एकूण ८९ हजार रुपयांचा माल जप्त‎ केला आहे. ही कारवाई वनपाल‎ एस.एच. जगताप यांच्या नेतृत्वात‎ वनरक्षक एस.एस. बहुरूपे, एस.पी.‎ कुशोड, चालक संतोष जाधव यांनी‎ केली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र‎ अधिकारी नेहा मुरकुटे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली वनपाल एस.एच.‎ जगताप हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...