आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठार:समृद्धी महामार्गावर अवैध वाहतूक सुरू; भरधाव जाणाऱ्या टिपरच्या अपघातात एकजण ठार

मेहकर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरा लागून असलेल्या इंटरचेंज जवळ गुरुवारी मध्यरात्री एम.एच. २८ / एबी. / ९९७७ या क्रमाकांच्या टिपरच्या अपघात झाला. या अपघातात टिपर चालक दीपक ज्ञानेश्वर मुंढे याचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री दहाच्या वाजेच्या सुमारास दीपक मुंडे हे टिप्परचे काम करून समृद्धी महामार्गाने किनगाव जट्टू आपल्या गावाकडे जात असताना त्याने तीन फुटाचे गतिरोधक न पाहता थेट टिप्पर गतिरोधकावरून नेले. त्याचवेळी चालक दीपक हा वाहना बाहेर फेकल्या गेला. तर टिप्पर त्याच्यावर जावून पडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात टिप्परचे मागील दोन्ही चाके उखडून नदीपात्रात जावून पडले. महामार्ग सुरू झाला नसताना देखील सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. तरी महामार्गावरून वाहतूक सुरूच आहे.

बातम्या आणखी आहेत...