आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाहतूक:रेतीची अवैध वाहतूक करणारा टिपर जप्त ;विशेष पथकाने गुरुवारी सकाळी वरवट बकाल येथे कारवाई

संग्रामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाण नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. विशेष पथकाने गुरुवारी सकाळी वरवट बकाल येथील संस्थेच्या एका गोडाउनमागे अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी १६४० या वाहनावर कारवाई केली. त्यामध्ये एक ब्रास अवैध रेती असल्याचे आढळून आले. महसूल विभागाचे एच. एन. उकर्डे यांच्या पथकातील तलाठी पी. व्ही. खेळकर, तलाठी एस. ए. गाडे, ए. आर. खरे यांनी घटनास्थळी पोहोचून ही कारवाई केली. पंचनामा करून वाहन मालक गजानन विश्वनाथ वखारे याचे बयान नोंदवण्यात आले असून, वाहन जप्त करून तामगाव पोलिस ठाण्यात जमा केले.

बातम्या आणखी आहेत...