आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तणावमुक्त राहिल्यास आजार नियंत्रणात

शेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. शशिकांत जोशी यांचे प्रतिपादन, आरोग्य तपासणी शिबिर

प्राणायाम योगा, सकस आहार तसेच आनंदी जीवन पद्धतीने तणावमुक्त राहून असंसर्गजन्य आजार नियंत्रणात राहू शकतात, असे प्रतिपादन तालुक्यातील वरखेड येथे आयोजित शिबिरात नागझरी आरोग्यवर्धनीचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत जोशी यांनी केले.

तालुका आरोग्य विभाग व आरोग्यवर्धिनी केंद्र नागझरी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० मार्च रोजी तालुक्यातील वरखेड येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण घोंगटे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय हागे यांच्या मार्गदर्शनाखाली असांसर्गिक रुग्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, कर्करोग या आजारा बाबत महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व नागरिकांना असांसर्गीक आजारांची माहीती देण्यात आली. वरील आजार टाळण्याच्या दृष्टीने कोणती खबरदारी घ्यावी याबाबत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी यांनी सांगीतले की, नियमित आरोग्य तपासणी करून असांसर्गिक आजार असल्यास शुगर, बीपीच्या गोळ्या नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घ्याव्यात. तसेच गोळ्या मध्येच बंद न करता वैद्यकीय सल्ल्यानेच त्या बंद कराव्यात, असे सांगितले. यावेळी आरोग्य सेविका श्रीमती कोगदे, आरोग्य सेवक मारोडे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा वरखेड गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराच्या यशस्वितेसाठी गट ग्रामपंचायतीच्या सरपंच विजयाताई कराळे, माजी सरपंच अर्चना हिंगणे, उपसरपंच चंद्रकला सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य केशव हिंगणे, संघपाल सिरसाट, गजानन हिंगणे, शीतल भांगे यांच्यासह गणेश कराळे, केशव हिंगणे यांनी सहकार्य केले. ग्रामस्थांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद देऊन शिबिर यशस्वी केल्याबद्दल आरोग्य विभागाचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...