आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूर:वादळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना तत्काळ मदत

मलकापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा तालुक्यामध्ये १० जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. यात अनेक घरांची पडझड होवून धानोरा, विटाळी, सिरसोडी येथील घरांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन सानुग्रह मदत देण्याच्या सूचना आमदार राजेश एकडे यांनी तहसीलदार यांना दिल्या तर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा याकरता संबंधितांना सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्तांना प्रत्येक चार हजार रुपये सानुग्रह मदत दिली.

याप्रसंगी आमदार राजेश एकडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन धानोरा येथील ५० घरे व गोठे यांचे अंशत, विटाळी येथील तीन घरांचे पुर्णत: तर सिरसोडी येथील ४९ घरांचे, काटी येथील ३ घरांचे अंशत: नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना प्रत्येकी चार हजार रुपये सानुग्रह मदत दिली. तर नुकसानग्रस्तांना पुढील ९५ हजार रुपयांची मदत देखील देण्याबाबत तहसीलदार यांना सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार राहुल तायडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, विश्वास नरवाडे, लाला इंगळे, तलाठी अंजली सराफ, कृषी सहाय्यक उमेश अढाव, सरपंच गजानन क्षीरसागर,बोदवडे, शांताराम फाटे, मनोहर राऊत,भास्कर फाटे, रघुनाथ पारधी, वासुदेव फाटे, रामचंद्र क्षीरसागर, मधुकर बोरसे, शांताराम पारधी, उज्ज्वल क्षीरसागर, विष्णू क्षीरसागर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...