आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभू श्रीरामाच्या चरित्राचे मानवी जीवनात अनन्य महत्त्व तथा प्रभाव असून रामाचे गुण प्रत्येकाने अंगीकृत करावे. श्रीरामांनी विविध संकटांचा सामना प्रयत्नांच्या पराकाष्टेतून केला. अभ्यासाअंती प्रयत्न केल्यास असाध्य बाबी साध्य होतात हे दर्शवितात. याचप्रमाणे आदर्श शिष्य, पुत्र, बंधू, पती, मित्र, आदर्श राजा ते आदर्श शत्रू या श्रीरामांच्या पात्रांचा आदर्श पिढ्यांपिढ्या दिपस्तंभा सारखा तेवत राहील, असे प्रबोधन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले.
कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनुराधा परिवाराने आयोजित केलेल्या १३ दिवशीय समाजोपयोगी कार्यक्रमांतर्गत स्व. तात्यासाहेब बोंद्रे लिखीत तत्वबोध रामायण या विषयावर चार दिवशीय पुष्प आयोजन करण्यात आले होते.
यात महर्षी वाल्मीकी रचित रामायणातील अयोध्याकांड, बालकांड, अरण्यकांड, किश्किंदाकांड, सुंदरकांड, युद्धकांड या विषयी निरूपण तथा वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रध्दा या विषयी व्याख्यान करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, सिद्धेश्वर वानेरे, डॉ. के. आर. बियाणी, डॉ. अरुण नन्हई, तर उपसंहार संवाद राहुल बोंद्रे यांनी साधला. सुंदरकांड पुष्प गुंफताना यातील नायक महाबली हनुमान यांचे महान कार्य विषद करीत, हनुमान रामेश्वर ते लंकेत रावणाच्या महालापर्यंत, तेथुन अशोक वाटिका विध्वंस, रावणपुत्र अक्षय संघर्ष, ब्रम्हास्त्र वापरातून बंदिस्त केले हनुमान, लंका दहन, आदींवर प्रबोधन करण्यात आले. व्यसनमुक्त राम राज्य, परस्पर बंधुभाव, समता, विद्वानांचा सन्मान, माता पिता गुरू यांचा आदर, या जिवन प्रवासात प्रयत्नांच्या पराकाष्टेमुळेच श्रीरामाने आलेल्या विविध संकटांवर केलेली मात, श्रीरामांची गुणग्राह्यता प्रयत्नवाद मानवाने अंगीकृत करावा, श्रीरामाला दैवी रूपात न स्विकारता मानवी प्रयत्नवादाचा महामेरू म्हणुन बघण्यात यावे, आदी विषयी निरूपण करण्यात आले. तर या चार ही पुष्प निरूपण प्रसंगी समारोपीय उपसंहार संवाद राहुल बोंद्रे यांनी साधला.
स्व. तात्यासाहेबांच्या जीवनाचा आदर्श अंगीकारा
तत्वबोध रामायणकार स्व. तात्यासाहेब यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल २२ वर्षे वानप्रस्थ स्वीकारून व्रतस्थ जीवन जगले, त्यांच्या व्रतस्थ जीवनातुन झालेल्या उर्जा प्राप्तीमुळेच शैक्षणीक, सहकार, सामाजिक इत्यादींच्या माध्यमातुन अनुराधा परिवाराच्या संस्था उभारल्या गेल्या. स्व तात्यासाहेब यांच्या व्रतस्थ वानप्रस्थ जिवनाचा आदर्श अंगीकृत करीत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, त्यांनी मानवसेवेबरोबरच सामाजिक क्रांती घडवण्याकरिता दिलेली शिकवण आयुष्यभर प्रेरणादायी ठरेल असे चार दिवसीय तत्वबोध रामायण निरूपण उपसंहाराच्या माध्यमातुन राहुल बोंद्रे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.