आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:दुसऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरकुट कुटुंबावर ओढावले संकट

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पत्नीला कार चालवण्यासाठी दिली. यावेळी अचानक समोर आलेल्या दुसऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार विहिरीत कोसळली अन् एका कुटुंबातील दोघांचा अंत अन् एकजण बचावल्याची दुर्देवी घटना घडली. या कुटुंबातील पाच वर्षाचा मुलगा शिवराज शाळेत गेल्याने या दुर्दैवी घटनेत बचावला. आई व बहीण गमावल्याचे दुःख मात्र त्याच्या नशिबी आले. ही घटना गुरुवारी दुपारी देऊळगाव राजा शहरातील रामनगर परिसरातील चिखली बायपासजवळ घडली.

डोहरी तालुका सिंदखेड राजा येथील मुळचे रहिवासी असलेले अमोल दिनकर मुरकुट (३९) हे नळणी तालुका भोकरदन येथील शाळेत नोकरीवर आहेत. तर रामनगर, देऊळगाव राजा येथे ते कुटुंबासह राहतात. गुरुवारी पाच वर्षांच्या मुलाला सहकार विद्या मंदिरात पाठवले होते. मुलगी सिद्धी अमोल मुरकुट (१२), पत्नी स्वाती अमोल मुरकुट (३५) हे तिघे घरुन चारचाकीने निघाले. स्वाती या चारचाकी चालवणे शिकल्या होत्या. त्यामुळे त्या वाहन चालवत असतानाच समोर येणाऱ्या एका वाहनाला वाचवताना कट मारला अन् हीच वेळ त्यांच्यासाठी काळघात ठरली. त्यांची कार विहिरीत कोसळली. अमोल मुरकुट यांनी वाहनातून उडी मारल्याने एका झाडाला अडकले अन् ते वाचले. मात्र या सर्वांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणारा पानटपरी चालक पवन पिंपळे हा सुद्धा ठार झाला.

वाचवणाऱ्या पवनच्या कुटुंबावरही आघात देऊळगाव राजा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील रहिवासी पवन पिंपळे हा पानटपरी व्यावसायिक आहे. त्याच्या समोर ही घटना घडल्यानंतर त्याने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र तो एकदा खाली गेला पुन्हा वर आलाच नाही. त्याच्या कुटुंबावर हा मोठा आघात झाला आहे. कारण या कुटुंबातील तो एकटाच होता. त्याच्या भावाचा व वडिलांचाही मृत्यू झाला आहे. तो आईसोबत राहत होता. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झालेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...