आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक!:बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईहून परतला होता कुटुंबातील सदस्य

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जळका भडंग येथील एका व्यक्तीसोबत 7 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुण्याहून आलेला 25 वर्षीय तरुण गावातील पहिला कोरोना बाधित आढळला होता. त्याच्या कुटुंबाचे आणि संपर्कातील इतरांचे स्वाब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर या बाबत आरोग्य विभागाकडून आज सकाळी माहिती मिळाली. 6 रिपोर्ट निगेटिव्ह आलेत पण पॉझिटिव्ह रिपोर्टच्या संख्येने प्रशासनाला हादरा दिला. संबधीत तरुणाच्या कुटुंबातील 7 जण कोरोना बाधित आहेत. आई-वडील, दोन लहान मुली, पुतण्या तसेच इतर मिळून एकूण 7 जण पॉझिटिव्ह मिळून आल्याने खामगाव सह बुलढाणा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. रिपोर्ट रात्री उशिरा दीड वाजता प्राप्त झालेत. बुलडाणा जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे, जिथे एका व्यक्ती सोबत 7 जण कोरोना बाधित आढळलेत. हा 25 वर्षीय तरुण आणि कुटुंब मिळून आता जळका भडंग या छोट्याशा गावात एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या 8 वर पोहचली आहे.

पिंपळगाव राजा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्राम जळका भडंग येथे कोरोना पॉझिटिव्ह संख्या 8 वर गेल्याने ग्रामीण परिसरासह बुलडाणा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करीत असून स्यानिटायझर व मास्क चा नियमितपणे वापर करण्याबाबत नागरिकांनी दखल घेणे गरजेचे आहे. बुलडाणा जिल्यात ही सर्वात मोठी घटना कोरोना च्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नागरिकांसमोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी आपापल्या घरात राहून सोशल डिस्टन्स पाळत स्वछता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ठाणेदार सचिन चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंडारे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...