आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:देऊळगावराजात हटवले‎ गल्लीबोळातील अतिक्रमण‎

देऊळगावराजा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गल्लीबोळात सार्वजनिक‎ नालीवर केलेले बांधकाम व‎ अतिक्रमण नगरपालिकेने हटवले.‎ नाली स्वच्छतेच्या कामात अडथळा‎ ठरणारे हे अतिक्रमण जेसीबीच्या‎ साह्याने हटवण्यात आले.‎ शहरातील खाटीक गल्ली,‎ मेहबूबपुरा, कबाडपुरा भागातील‎ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नालीवर‎ अतिक्रमण केले होते. नालीवर‎ सिमेंट काँक्रीटचे ढापे टाकून‎ अतिक्रमण केल्याने पालिकेच्या‎ सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता करणे‎ अडचणीचे ठरत होते.

तसेच घाण‎ आणि कचऱ्याने नाल्या गच्च‎ भरल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त घाण‎ पाणी शिरत असल्याने नागरिकांच्या‎ आरोग्याला धोका निर्माण झाला‎ होता. मागील आठवड्यात या‎ भागातील महिलांनी नगरपालिकेच्या‎ प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले,‎ त्यावेळी अतिक्रमणधारकांना‎ पालिकेने नोटीस बजावून स्वतःहून‎ अतिक्रमण काढून घेण्याची सूचना‎ केली होती. नागरिकांनी मुदतीच्या‎ आत अतिक्रमण न काढल्यास‎ मोहीम राबवण्याचा इशारा‎ मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनी‎ दिला होता.‎ मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने‎ शुक्रवारी जेसीबीद्वारे हे अतिक्रमण‎ काढण्यात आले. पालिकेचे आरोग्य‎ निरीक्षक खर्डीकर, राजेंद्र वानखेडे,‎ कैलास सुनगत, कदीर नाकेदार‎ यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही‎ मोहीम राबवली.‎

बातम्या आणखी आहेत...