आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला पाऊस:देऊळगावराजा परिसरात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली; विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू

देऊळगावराजा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून मान्सून पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी विद्युत तार तुटल्या तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहे.तर एका शेतकऱ्याचा बैल विजेचा शॉक लागून मरण पावला आहे. शहरातील नाल्यांची पावसाळ्या पूर्वी सफाई न झाल्यामुळे नालीतील पाणी उताराच्या दिशेने असलेल्या काही नागरिकांच्या घरात शिरल्याने प्रशासनाचा उदासीन कारभार उघडा पडला आहे.

मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जिल्हाभरात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. देऊळगावराजा शहरासह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. तर विजेची तारे तुटून सुमारे सहा तास शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सुसाट वाऱ्यासह सलग एक तास झालेल्या वादळी पावसाने शहरातील सिव्हील कॉलनीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील निलगिरीचे झाड भाजप नेते गणेश मांटे यांच्या घरावर कोलमडून पडल्याने घराचे पिलर व समोरील टीनशेडचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर पोलिस स्टेशनचे आवारातील झाडे, प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील झाडांसह अनेक झाडे सुसाट वाऱ्यामुळे उन्मळून पडली. त्यात इलेक्ट्रिक खांब वाकून पडल्याने महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील भिवगाव येथील शेतकरी किशोर बाबुराव शिंदे यांच्या गोठ्या समोर बांधलेल्या बैलावर वीज तार पडल्याने मृत पावला.

बातम्या आणखी आहेत...