आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर; चव्हाण कुटुंबीयांनी  सुरू केले उपोषण

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच गर्भवती महिलेला मारहाण करून गर्भ पाडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करून आरोपी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मेहकर तालुक्यातील वरुड येथील चव्हाण कुटुंबीयांनी काल ३ जून दुपार पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरू केले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार १ मे रोजी गावातील एका समाजाच्या महिला व पुरुषांनी संगनमत करून घरावर हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महिलांची छेडखानी केली, गर्भवती नंदा चव्हाण हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तीचा गर्भ पाडला. पिंटू पवार याने मोबाईल, चार हजार रुपये व चार ग्रॅम सोन्याचे टॉप व सोन्याची पोत तोडून घेतली. पोलिसांनी आरोपीवर कारवाई न करता उलट आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे आरोपीला मिळालेली जमानत रद्द करून चव्हाण परिवाराला पोलीस सरंक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सतीश विठ्ठल चव्हाण, बाळु चव्हाण व अन्य सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...