आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीबी पथकाची कारवाई:अवघ्या बारा तासात आवळल्या‎ तीन चोरट्यांच्या मुसक्या‎ ; 52 हजारांचा ऐवज जप्त‎

बुलडाणा‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज चोरीच्या‎ घटना घडत आहे. शहर पोलिसांच्या‎ डी.बी.पथकाने काही तासातच चोरीच्या‎ घटनांचा शोध लावून तीन चोरट्यांच्या मुसक्या‎ आवळल्या. त्यांच्या ताब्यातून ५२ हजार ४००‎ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला . ही‎ कारवाई शुक्रवारी करण्यात आली ‎.‎ बुलडाणा शहरात काही दिवसांपासून‎ चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन‎ दिवसापूर्वी चोरट्यांनी संगम चौकातील लकी‎ ज्युस सेंटर फोडून सत्तर हजार रुपये लंपास केले‎ होते. याबाबत आरिफ बागवान रा. विदर्भ‎ हाउसिंग सोसायटी यांच्या तक्रारीवरून शहर‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ होता. ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने सीसीटीव्ही‎ फुटेजची पाहणी करत बारा तासाच्या आत विधी‎ संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवून विचारपूस‎ केली असता त्याने आपल्या सोबत यश साठे‎ असल्याचे सांगितले.

या माहितीवरून‎ पोलिसांनी शुक्रवारी यश संतोष साठे (१९) रा.‎ मिलींद नगर, व दोन विधीसंघर्षग्रस्त बालकास‎ ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख ४१ हजार‎ रुपये व चोरीच्या पैशातून घेतलेला सॅमसंग‎ कंपनीचा अकरा हजार चारशे रुपये किमतीचा‎ मोबाइल असा एकूण ५२ हजार ४०० रुपयांचा‎ ऐवज जप्त केला. तसेच ४ मार्चच्या रात्री टिकार‎ बुक स्टोअर्स जवळील बँक ऑफ इंडियाचे‎ एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या‎ अनोळखी आरोपी व ताब्यात घेण्यात आलेले‎ विधीसंघर्ष ग्रस्त दोन बालक हे एकच असल्याचे‎ तपासात स्पष्ट झाल्याने विधी संघर्षग्रस्त बालक‎ या दोघांनी या गुन्ह्याबाबत कबुली दिली आहे.

ही‎ कारवाई शहरचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या‎ मार्गदर्शनात डी. बी. पथकाचे पोलिस‎ उपनिरीक्षक सखाराम सोनुने, सहायक फौजदार‎ माधव पेटकर, पोहेका. प्रभाकर लोखंडे,‎ नापोकॉ गजानन जाधव, नापोकॉ सुनील मोझे,‎ गंगेश्वर पिंपळे, महिला पोलिस कर्मचारी सुनीता‎ खंडारे, शिवहरी सांगळे, युवराज शिंदे, विनोद‎ बोरे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक‎ फौजदार नामदेव खवले, बळीराम खंडागळे,‎ नापोकॉ प्रकाश दराडे व गजानन मोरे यांनी‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...