आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढतीचे चित्र स्पष्ट:खामगाव तालुक्यात सरपंच पदासाठी 65  तर सदस्यासाठी 219 अर्ज कायम

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ६५ तर सदस्यपदासाठी २१९ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. मुदत संपलेल्या सोळा ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत ७ डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. तालुक्यातील दीवठाणा, वडजी, लोखंडा, नांद्री, कवडगाव, कोंटी, सजनपुरी, माक्ता, खुटपुरी, किन्ही महादेव, नागापूर, नायदेवी, जळका तेली, वझर, झोडगा, लोणी गुरव या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्यात आले व चिन्ह वाटप करण्यात आले. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल खामगाव तालुक्यात सरपंच पदासाठी ...केले होते. उमेदवारांनी यापैकी ३७ अर्ज मागे घेतले त्यामुळे ६५ उमेदवार कायम राहिले आहेत. तर सदस्य पदासाठी २६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ४६ उमेदवारांनी माघार घेतली.

त्यामुळे २१९ उमेदवार कायम राहिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर उमेदवाराच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी व चिन्ह वाटप करण्यासाठी उमेदवारांनी निवडणूक विभागात एकच गर्दी केली आहे.खामगावचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अतुल पाटोळे व नायब तहसीलदार हेमंत पाटील, परिविक्षाधिन तहसीलदार पवन पाटील, गजानन बोरले हे निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...