आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनासारख्या जागतिक महामारी, नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमाने आणि धीराने महाराष्ट्र सांभाळला. या कामगिरीची दखल देशभरात घेतली गेली. मात्र केवळ द्वेष भावनेतून नाहक आरोपांची राळ उठवणाऱ्या विरोधकांना आपल्याला विजयातून उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे आगामी काळातील नगरपालिका व जिल्हा परिषद सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने झोकून देऊन सांघिक भावनेतून काम करावे, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
बुलडाणा येथील कृउबासच्या छत्रपती श्री.शिवाजी महाराज सभागृहात जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, प्रा. बळीराम मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्कल निहाय बैठका घेऊन इलेक्टिव्ह मेरिट शोधा. जबाबदारी समजून घेऊन काम करा अशा सूचना देत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजीराव देशमुख, बाबुराव मोरे, दीपक बोरकर, संजय अवताडे, वसंतराव भोजने, राजू पाटील मिरगे, तुकाराम काळपांडे, रामदास चौथनकर, लखन गाडेकर, कपिल खेडेकर, दादाराव खार्डे, शिवप्रसाद ठाकरे, सुरेश वाळूकर, सुरेश वावगे, गजानन वाघ, रवींद्र झाडोकार, संतोष डिवरे, विजय साठे, गजेंद्र दांदडे, श्रीराम झोरे, पांडुरंग सरकटे, सुरेश खर्चे , रमेश भट्टड, विजय काळे, बद्रीनाथ बोडखे, नंदू कऱ्हाडे, प्रदीप म्हस्के, संदीप मगर, गजानन उबरहंडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार गजानन धांडे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.