आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांच्या निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १६ सरपंचपदासाठी ६५ उमेदवार तर सदस्यपदाच्या ८० जागांसाठी मतदान होणार आहे. तर ४३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ३ जागा रिक्त आहेत. १६ सरपंचांपैकी ८ जागांवर महिला सरपंचांचे राज राहणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली असली तरी एकाही गावातील सरपंचाची निवड बिनविरोध करण्यात गावातील पुढाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे सरपंचाची व सदस्यांची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे.
निवडणुकीला अवघे ७ दिवसाचा कालावधी असल्याने गावागावात प्रचाराचे भोंगे वाजू लागले आहेत. गत २-३ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने त्यापासून बचाव व्हावा यासाठी गावा गावात शेकोट्या पेटू लागल्या आहे. त्या शेकोटीच्या घोळक्याने बसलेल्या लोकांमध्ये निवडणुकीच्या चर्चा चर्चिल्या जात आहेत. निवडणूक विभागातर्फे निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. मतदान कक्षात नियुक्ती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी वर्ग घेण्यात येत आहे. मतदान पार पडेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कामाचा जादा बाेजा असणार आहे.
या ग्रा.पं. प्रतिष्ठेच्या
खामगाव शहरा पासून जवळच असलेल्या सजनपुरी, लोखंडा, कोक्ता, खुटपुरी, वझर, नायदेवी, लोणीगुरव, जळकावेली, दिवठाणा या गावातील निवडणुका आजी व माजी आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. त्यामुळे ते आगामी काही दिवसात प्रतिष्ठा पणाला लावुन या ग्रामपंचायतीवर सरपंच व सदस्य रूपाने आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समजली आहे.
सोशल मीडियावर उमेदवारांच्या जाहिरात
बॅनर, लाऊड स्पीकर तसेच सोशल मीडियावर उमेदवारांच्या जाहीराती दिसत आहेत. यावर उमेदवाराचा फोटो, चिन्ह, मतदानाची तारीख तसेच मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे
एकूण मतदार संख्या
१६ ग्रा.पं.मधील १८ हजार २४२ मतदार हे आपल्या पसंतीचा सरपंच व सदस्यांची निवड करणार आहे. एकूण मतदारांपैकी पुरुष मतदार संख्या ९७९३ तर महिला ८४४९ अशी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.