आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभुमीवर डी. बी. पथकाने शहरात विविध ठिकाणी धाडी टाकून गावठी दारुचे अड्डे उध्वस्त केले आहेत. यावेळी पोलिसांनी दारु विक्रेत्यांकडून ३१७ लिटर गावठी दारु व ९५० लिटर मोहसडवा व साहित्य असा एकूण ८८ हजार १०० रुपयाचा माल जप्त करुन तो नष्ट केला आहे. ही कारवाई आज ६ मार्च रोजी करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे गावठी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डी. बी. पथकाने आज ६ मार्च रोजी सकाळी सहा वाजेपासून शहरातील कैकाडीपुरा, भिलवाडा व जुनागाव परिसरात गावठी दारूची निर्मिती करून त्याची विक्री करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवून पाच दारु विक्रेत्या विरुध्द धडक कारवाई केली.
यावेळी दारु विक्रेत्यांकडून ३१७ लिटर गावठी दारु व ९५० लिटर मोहसडवा व दारु काढण्याचे साहीत्य असा एकूण ८८ हजार १०० रुपयांचा माल जप्त करुन तो नष्ट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रमेश शंकर शिंदे रा. आंबेडकर नगर, बाबू पंडीत जाधव रा. कैकाडी पुरा, उषा अंकुश गायकवाड रा. वाॅर्ड क्रमांक एक, मीना संजय पवार रा. जुनागाव, अनिता रवी पवार, रा. आंबेडकर नगर यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड, अपर पोलिस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत अहीरराव, सहायक फौजदार माधव पेटकर, पोहेका प्रभाकर लोखंडे, नापोका रवींद्र हजारे, गजानन जाधव, नापोका सुनील मोझे, गंगेश्वर पिंपळे, सुनीता खंडारे, पोका शिवहरी सांगळे, युवराज शिंदे, विनोद बोरे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.