आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग:समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचे फर्दापूर टोल प्लाझावर होणार थेट प्रक्षेपण

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मेहकर येथील फर्दापूर टोल प्लाझा येथे दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खा. प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्याच्या विकासात भर पाडणारा नागपूर-मुंबई स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा जिल्ह्यातून मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा या तालुक्यातून ८९ किलोमीटरचे अंतर पार करून जात आहे. या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर ही दोन्हीही मेट्रो सिटी बुलडाण्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्याला जोडल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठया प्रमाणात भर पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...