आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शिवणी आरमाळ येथे जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे उद्घाटन

शिवणी आरमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत येथील जैविक शेतीचा अवलंब करणारे शेतकरी भगवान पाटीलबा गायके यांच्या जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे उद्घाटन सरपंच कांताबाई सोनपसारे,उपसरपंच कैलाश आरमाळ, तंटामुक्ती अध्यक्ष शेख इमाम शेख गफुर,ज्येष्ठ नागरिक नामदेव आरमाळ यांच्यासह गावातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनोद पंडित यांनी जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र स्थापनेचे उद्दिष्ट सांगितले. तर क्षेत्र प्रवर्तक गणेश भानुसे यांनी दशपर्णी आणि निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत व फायदे सांगितले.सुरेश शेळके यांनी गांडूळ खत, व्हॅर्मी वॉश व जीवामृत तयार करण्याची पद्धत आणि फायदे सांगितले. यासह अतुल जाधव यांनी मध्य हंगामातील शेतकरी प्रशिक्षण संदर्भात माहिती दिली.

शेतकरी भगवान गायके यांनी जैविक शेतीपासून शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकांपासून होणारे दुष्परिणाम या विषयी योग्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर वायाळ यांनी तर आभार अतुल जाधव यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभम बाथरी,अशोक तांबेकर, प्रभाकर वाघ, सुनील भानुसे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...