आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक भारत श्रेष्ठ भारत खेलो इंडिया जीतो इंडिया अभियाना अंतर्गत सागवन येथे जिल्हा परिषद क्रिकेट चषक२०२३ चे भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतीश भाकरे पाटील व गोल्डन सिटी क्लब सागवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. २८ फेब्रुवारी रोजी युवासेना नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद क्रिकेट चषकाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून भाजप तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, दत्ता पाटील, ॲड.मोहन पवार, संदीप उगले, सरपंच आरती सुहास वानेरे, अरुण भोंडे, ॲड. दशरथसिंह राजपूत, गजानन देशमुख, योगेश राजपूत, राजेंद्र पवार, ॲड.मुकरम बागवान, ग्रामपंचायत सदस्य गोपाल भाग्यवंत, सारंग सुरोशे, प्रवीण वाघलव्हाळे, अलीम शेठ, ज्योती वानेरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश राजपूत, प्रास्ताविक सतीश भाकरे पाटील यांनी तर आभार गोपाल तायडे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.