आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य:विदर्भ महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन ; प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विदर्भ महाविद्यालयात इंग्रजी व मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. डी. हुडेकर हे होते. तर उद्घाटक म्हणून भादोला येथील शाहीर व वामनदादा कर्डक यांच्या साहित्याचे अभ्यासक मोहन सरकटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. मुनेश्वर जमाईवार यांनी भाषा, साहित्य व संस्कृती यावर प्रकाश टाकून भाषा अभ्यास मंडळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. त्यानंतर शाहीर मोहन सरकटे यांनी इंग्रजी व मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन करून अभ्यास मंडळाची कार्यकारी समिती जाहीर केली. त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या साहित्यावर प्रकाश टाकून त्यांच्या काही प्रसिद्ध कविता सुद्धा सादर केल्या. प्राचार्य डॉ. हुडेकर यांनी विद्यार्थ्यांना भाषा ही दैनंदिन जीवनात किती महत्त्वाची आहे. तसेच विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य व संभाषण कौशल्य आपल्यात विकसित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण शिराळे यांनी केले, तर आभार प्रा. वैभव वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सागर दांदडे, संजय पांडे, विष्णू गाडेकर, योगेश गायकवाड, मंगेश शिरसागर, पंजाब मोरे, बाबुराव इंगळे, संदीप वारे, कैलास उबरहंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...